Chitra Wagh criticizes Thackeray regarding budget
अर्थसंकल्पाचा आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध? खंडणी वसुली म्हणजे त्यांची जमा आणि सुपाऱ्या देणे म्हणजे त्यांचा खर्च आहे. एखाद्या महिन्यात जमा जास्त होते, एखादेवेळेस खर्च जास्त होतो, दुसरे काय? असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
(Chitra Wagh Vs Uddhav Thackeray) मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीातारामन यांनी शनिवारी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये त्यांनी वार्षिक 12 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, यामुळे फार नोकरदारांना लाभ होणार नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावरून भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, वेड्यांच्या बाजारात बुद्धीची भ्रांत असल्याचे म्हटले आहे. (Chitra Wagh criticizes Thackeray regarding budget)
ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनाच्या ‘मधाळलेली सुरी!’ या शीर्षकाच्या अग्रलेखातून केंद्रीय अर्थसंकल्प कसा फसवा आणि खोटा आहे, याचे गणित मांडण्यात आले आहे. हे बजेट काही असाधारण वगैरे नाही. सामान्य कुवतीच्या महिलेने सामान्य बुद्धिमत्तेच्या सरकारसाठी तयार केलेले हे राजकीय बजेट आहे. निर्मला सीतारामन या ‘खडूस’ बाईने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अद्यापही भक्तांचे टाळ्या वाजवणे संपलेले नाही. जणू काही सामान्य जनता आणि मध्यमवर्गीयांच्या घरावर सोन्याची कौलेच चढणार आहेत अशा पद्धतीचा गाजावाजा सुरू झाला आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut about Budget : संजय राऊतांची बजेटवर टीका, कार्टून शेअर करत बेरोजगारीवर बोट
याबाबत संताप व्यक्त करत आमदार चित्रा वाघ यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पाचा आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध? खंडणी वसुली म्हणजे त्यांची जमा आणि सुपाऱ्या देणे म्हणजे त्यांचा खर्च आहे. एखाद्या महिन्यात जमा जास्त होते, एखादेवेळेस खर्च जास्त होतो, दुसरे काय? असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. दरवर्षी एकच ठरलेली स्क्रिप्ट वाचायची, एवढेच त्यांच्या हातात असते आणि पूर्वी एकदा त्यांनी कबूलही केले आहे की, अर्थसंकल्पातील मला काही कळत नाही… मग ते कशाला नाक खुपसतात? त्यांच्या बुद्ध्यांकाची कीव करावीशी वाटते, अशी खरपूस टीका चित्रा वाघ यांनी केली.
त्यातही टीका कुठे केली जाते? तर पेपर त्यांचा, लेखकही त्यांचा आणि वाचकही फक्त त्यांचाच आहे आणि या सगळ्यांना माहीत आहे की, त्यांना अर्थसंकल्पातील ‘ओ का ठो’ कळत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला एवढाच धंदा त्यांच्या हातात राहिला आहे, असे सांगून त्या म्हणतात, कोण सर्वसामान्य, कोणाला काय कळत नाही, हे शोधत बसण्यापेक्षा थोडे लक्ष आपल्या गटाकडे द्यावे. एखादा माजी नगरसेवक किंवा माजी आमदार तरी त्यांच्या गटात शिल्लक राहील… बुडत्याला तेवढाच काडीचा आधार ठरेल. त्यांच्या वेड्यांच्या बाजारात बुद्धीची भ्रांत आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर सारी संक्रांत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. (Chitra Wagh Vs Uddhav Thackeray: Chitra Wagh criticizes Thackeray regarding budget)
हेही वाचा – Budget 2025 : 12 लाख करसवलतीचा फायदा कोणाला? शिवसेना ठाकरे गटाने आकडेवारीसह मांडले गणित
Comments are closed.