नेलपोलिश टिप्स: स्किन टोनस लावा नेलपोलिश अनुसरण करा किंवा टिपा अनुसरण करा

अनेकदा बाजारात आपल्याला एखादे नेलपॉलिश आवडते आणि आपण ते खरेदी करतो. घरी आल्यावर जेव्हा आपण नखांना ते लावतो तेव्हा ते शोभून दिसत नाही. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार नेलपॉलिश लावणे गरजेचे आहे. कारण एखादे नेलपॉलिश आपल्या स्किन टोनला सूट न झाल्यास हात विचित्र दिसायला लागतात. चला तर मग जाणून घेऊया स्किन टोननुसार कोणते नेलपॉलिश लावावे?

  • जर तुमचा स्किन टोन फेर असेल म्हणजेच गोरा असेल आणि तुम्हाला खूप गडद रंगाचे शेड्स लावायचे असतील तर गडद निळा, लाल, नारंगी, रुबी रंगाचे शेड्स छान दिसतील. मात्र या स्किन टोनच्या लोकांनी ट्रांसपेरेंट रंगाचे नेलपॉलिश टाळावे, कारण गोऱ्या रंगामुळे हे उठून दिसत नाही.
  • जर तुमचा स्किन टोन सावळा असेल तर यावर कोणत्याही रंगाचे नेलपॉलिश शोभून दिसतात. गुलाबी, पिवळा, नारंगी असे चमकदार रंग तसेच गोल्डन किंवा सिल्व्हर रंग देखील त्यावर खूप चांगले दिसतात.
  • जर तुमचा स्किन टोन डार्क असेल तर गुलाबी आणि निऑन रंग लावले तर हे रंग चांगले दिसतात. तसेच तुम्ही ट्रांसपेरेंट रंगाचे नेलपॉलिश ट्राय करू शकता.

हे लक्षात ठेवा

नेल पॉलिशिंग प्रकार

नेलपॉलिशचे अनेक प्रकार आहेत. जसे की मॅट, शीअर फिनिश, ग्लॉसी, क्रीमी, ग्लिटरी, मेटॅलिक, टेक्सचर्ड फिनिश. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते निवडून तुमच्या हातांचे सौंदर्य वाढवू शकता. शिवाय आजकाल जेल आणि दीर्घकाळ टिकणारे ग्लॉसी फिनिश नेलपॉलिशला खूप मागणी आहे.

ब्रँडेड नेलपॉलिश वापर

स्किन टोननुसार नेलपॉलिश खरेदी करणे जितके महत्वाचे आहे तितकेच ब्रँडेड नेलपॉलिश खरेदी करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण एखादे नेलपॉलिश स्वस्त आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये मिळाले तरी ते नखांना घातक ठरू शकते. तसेच, जास्त रसायने असलेली नेलपॉलिश वापरल्याने नखे पिवळी पडतात. त्यामुळे नेहमी ब्रँडेड नेलपॉलिश खरेदी करा.

Comments are closed.