चौगुले संघाला इन्श्युरन्स शील्डच्या एलिट गटाचे विजेतेपद
चौगुले संघाने दमदार कामगिरी करत डाटामॅटिक्सचा पराभव करून इन्श्युरन्स शील्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटाचे विजेतेपद पटकावले. मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने झालेल्या अंतिम सामन्यात डाटामॅटिक्सचा डाव अवघ्या 104 धावांत आटोपला. आदित्य राणेने 8 धावांत 4 विकेट घेत डाटामॅटिक्सची फलंदाजी खिळखिळी केली. डाटामॅटिक्सकडून रवी विश्वकर्माने 27 चेंडूंत 37 धावांची झुंज दिली. प्रत्युत्तरादाखल साहिल जाधवने 33 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकारांसह 64 धावांची आतषबाजी केली, तर तुषार सिंगने 38 धावांचे योगदान दिले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, मिलिंद तेंडुलकर, सुनिता इंगळे, धर्मेंद्र ताहिलरामाणी, सुरेश आढाव उपस्थित होते.
Comments are closed.