पंजाब किंग्जकडून अनादर झाल्याचा ख्रिस गेलचा आरोप

वेस्ट इंडिजचा माजी धडाकेबाज सलामीवीर आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल आपल्या मोकळ्या स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, आयपीएलमधील अनुभवाबद्दल बोलताना गेलने आपली खिन्नता व्यक्त केली. त्याने पंजाब किंग्ज फ्रँचायझीकडून स्वतःचा अनादर झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अपमानामुळे माझी कारकीर्द वेळेआधीच संपली

माझं आयपीएल करिअर वेळेपूर्वीच संपलं. पंजाब किंग्जमध्ये माझा अनादर झाला. वरिष्ठ खेळाडू असूनही माझ्याशी लहान मुलासारखी वागणूक दिली गेली. जेव्हा तुम्ही फ्रँचायझीसाठी इतके देता आणि मग तुमच्याशी असे वागले जाते, तेव्हा तुम्ही आतून तुटून जाता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला नैराश्य (डिप्रेशन) जाणवलं, असेही गेल म्हणाला.

Comments are closed.