‘दबंग’मध्ये चुलबुल पांडे पुन्हा दिसणार!

सलमान खान पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दबंग अंदाजात दिसणार आहे. सलमान खानचा ‘दबंग-4’ चित्रपटसंबंधी मोठे अपडेट समोर आले आहे. अरबाज खानने स्वतः ‘दबंग-4’ संबंधी माहिती दिली आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित करण्यात येईल, यासंबंधी मी आताच तुम्हाला काही सांगू शकत नाही, असे अरबाज खान एका मुलाखतीत बोलताना म्हणाला. आम्ही सध्या यावर काम करत आहोत, परंतु चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी कोणतीही घाई नाही. सलमान खानसोबत चर्चा केल्यानंतर पुढचा प्लान ठरवू, परंतु सध्या कोणतीही घाई नाही, असे अरबाज म्हणाला.

Comments are closed.