पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात चूल पेटली!
सिलिंडर मिळत नसल्याने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅण्टीनला स्वयंपाकासाठी चुली पेटवण्याची वेळ आली आहे.
मुलींच्या वसतिगृहातही एकवेळचा स्वयंपाक चुलीवर केला जात आहे. वसतिगृहांमध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी राहतात. त्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.
थाळीतील खाद्यपदार्थही कमी केले असून दर वाढवले आहेत. मंगळवारी केवळ वरण-भात उपलब्ध होता. त्यासाठी तासभर विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागले.
सिलिंडर उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे सांगण्यात आले.
Comments are closed.