CIBIL स्कोअर किती असला की कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळतं, सिबील स्कोअर मोफत कसा तपासायचा?जाणून

नवी दिल्ली : अनेकदा आर्थिक अडचणींमुळं कर्ज घेण्याची आवश्यकता असते. क्रेडिट कार्डसाठी देखील अनेक जण अर्ज करत असतात. जेव्हा तुम्ही कर्ज काढण्यासाठी अर्ज करता किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा कर्ज देणाऱ्या बँका किंवा एनबीएफसी, क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांकडून अर्जदार व्यक्तीचा सिबील स्कोअर पाहिला जातो.  सिबील स्कोअर व्यक्तीनं कितीवेळा कर्ज घेतलंय, त्याची परतफेड कशा प्रकारे केलीय याच्यावर अवलंबून असतो. सिबिल स्कोअरवरुन कर्ज घेणारा व्यक्ती किती कर्ज परतफेडीबाबत किती विश्वासार्ह आहे हे सिबील स्कोअरवरुन ठरतं.

सिबील स्कोअर म्हणजे काय? (What is Cibil Score)

CIBIL स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. यावरुन एखाद्या व्यक्तीनं यापूर्वी किती कर्ज काढलंय, क्रेडिट कार्ड पेमेंटची वेळेत परतफेड केलीय का याची माहिती तिथं असते. बँक आणि वित्तीय संस्था सिबील स्कोअर पाहून त्या व्यक्तीला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देणं सुरक्षित आहे की नाही हे ठरवतात. यामुळं सिबील स्कोअर जितका अधिक असेल तितकी कर्ज मिळण्याची शक्यता वाढते.

सिबील स्कोअर किती असावा?

तुमचा सिबील स्कोअर 750 पेक्षा अधिक असेल तर चांगला मानलो जातो. चांगला सिबील स्कोअर असल्यानं कर्ज सहजपणे मिळतं याशिवाय त्या कर्जाचं व्याज देखील कमी असू शकतं. बहुतांश बँका आणि एनबीएफसी चांगला सिबील स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना कमी व्याजदरावर कर्ज देण्यास प्राधान्य देतात.

सिबील स्कोअर कुठं पाहायचा?

सिबील स्कोअर मोफत तपासयाचा असल्यास CIBIL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  पॅन कार्डचा क्रमांक नोंदवून मोफत सिबील स्कोअर पाहू शकता.

सिबीलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथं Get Your Free CIBIL Score पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा पॅनकार्ड क्रमांक, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर नोंदवा. ओटीपी वेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर पाहायला मिळेल. या वेबसाईटवर एका वर्षात एकदाच मोफत सिबील स्कोअर रिपोर्ट मिळतो.

सिबील स्कोअर चांगला राहण्यासाठी काय करावं?

एखाद्या बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतलं असल्यास त्या कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे. बँकेच्या कर्जाचा ईएमआय ज्या दिवशी असेल त्या दिवसापूर्वी बँक खात्यात रक्कम ठेवल्यास ईएमआयची रक्कम खात्यातून वजा होईल. कर्जाचा हप्ता थकणार नाही, यामुळं सिबील स्कोअर चांगला राहील. याशिवाय क्रेडिट कार्डची लिमीट जितकी असेल त्यापैकी केवळ 30 टक्के लिमीट वापरावी.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.