झुबिन गर्गच्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी सीआयडी

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममधील सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सीआयडीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झुबीन गर्ग हे सिंगापूर दौऱ्यावर असताना स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्यात उतरले असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आसाममध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच आसाममधील मोरीगाव पोलीस ठाण्यात ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानू महंता आणि व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. झुबीन यांना एका कार्यक्रमाच्या बहाण्याने परदेशात नेण्यात आले होते, परंतु खरा हेतू त्याचा खून करण्याचा होता, असा आरोप वकील रतुल बोरा यांनी एफआयआरमध्ये केला आहे. गायक गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यभरात अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर डीजीपी हरमीत सिंग यांना सर्व एफआयआर एकाच प्रकरणात एकत्रित करून तपास सीआयडीकडे सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Comments are closed.