सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचे आरोग्य धोके
सकाळचा चहा आणि आरोग्यावर परिणाम
सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे ही अनेकांची सवय असते. अलीकडील अभ्यासानुसार, भारतातील जवळपास ९०% लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा पितात. पण तुम्हाला माहित आहे का की या सवयीमुळे कर्करोगासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात?
चहामध्ये ॲसिडचे प्रमाण जास्त असते आणि रिकाम्या पोटी प्यायल्यास त्याचा तुमच्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.
बऱ्याच लोकांना कडक चहा आवडतो, परंतु दीर्घकाळ सेवन केल्याने पोटात अल्सर आणि ऍसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
जे पुरुष दिवसातून चार कपपेक्षा जास्त चहा पितात त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे चहाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे चांगले.
Comments are closed.