सोसायटीच्या पुनर्विकासासाठी साडेतीन लाख उकळले, सिडकोच्या तीन लाचखोर कर्मचाऱ्यांवर झडप

सोसायटीच्या पुनर्विकासासाठी पदाधिकाऱयाकडून साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना सिडकोच्या तीन कर्मचाऱयांसह चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी आज झडप घातली. सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या लिफ्ट खाली या लाचखोरांना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या आरोपींमध्ये कार्यालयीन सहाय्यक राहुल कांबळे, सहकार अधिकारी तानाजी काळोखे, शिपाई महेश कामोठकर आणि खासगी इसम किशोर मोरे यांचा समावेश आहे. वाशी येथील एका सोसायटीचा पुनर्विकास करण्यासाठी या चौघांनी सोसायटीच्या पदाधिकाऱयांकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर हा सौदा साडेतीन लाख रुपयांवर ठरला.
सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी या लाचखोरीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर अधिकाऱयांनी आज सिडकोच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाभोवती सापळा रचला. लिफ्ट जवळ पैसे घेत असताना राहुल कांबळे आणि महेश कामोटकर यांच्यावर झडप घातली. कसून चौकशी केल्यानंतर तानाजी काळोखे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
उपनिबंधक पाटील यांची चौकशी
उपनिबंधक प्रताप पाटील यांचीही क़सून चौकशी करण्यात आली. मात्र तक्रारदाराचे त्यांच्याशी कधी संभाषण झाले नाही. संशयित आरोपी आणि पाटील यांचाही लाचखोरी प्रकरणी संपर्क झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.
Comments are closed.