दिव्यातील 7 इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिव्यातील सात बेकायदा इमारती पालिका प्रशासनाने रिकाम्या केल्या आहेत. जवळपास २७५ कुटुंबे आणि १ हजार ६०० रहिवासी रस्त्यावर आले आहेत. दरम्यान एकीकडे शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असताना मात्र भूमाफिया, बिल्डर मोकाट कसे, असा सवाल उपस्थित झाला आहे.
दिव्यातील बेकायदा बांधकाम इमारती तोडल्यामुळे २७५ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. दिव्यातील ७ इमारती मधून बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव घातला असून, या रहिवाश्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेला दिला आहे. यावेळी बिल्डरवर गुन्हा दाखल करा, आम्हाला घरे द्या किंवा आताच्या बाजारभावाप्रमाणे आम्हाला पैसे द्या अशी संतप्ल मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला असून सोमवारी दिव्यात कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कारवाईला विरोध करत असलेल्या एका महिलेने तर पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले होते. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता. एकूण ७ इमारतींवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे.

Comments are closed.