ब्रिटनच्या संसदेबाहेर जोरदार आंदोलन, 400 अटकेत

पॅलेस्टाईन अ‍ॅक्शन ग्रुपवरील बंदीविरोधात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आज ब्रिटनच्या संसदेवर धडक देत निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी 400 हून अधिक निदर्शकांना अटक केली. ब्रिटन सरकारने पॅलेस्टाइन अ‍ॅक्शन ग्रुपला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्यास विरोध दर्शवत ’डिफेंड अवर ज्युरीज’ या संघटनेने संसदेवरील आंदोलनाची हाक दिली होती. यात 1500 लोक सहभागी झाले होते.

Comments are closed.