मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे राज्याला अभिवादन

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमीपुत्र देशाचे सरन्यायाधीश असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे, त्यामुळे राज्याच्या 13 कोटी जनतेच्यावतीने सभागृहात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीश यांनी सर्व मान्यवरांना अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या सर्व जनतेकडून हा सत्कार आहे. भारतीय राज्यघटना शालेय जीवनापासूनच माझ्या मनात रुजली आहे. संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद असल्याचे भूषण गवई यांनी म्हटलं. तसेच,माझे वडील आणि या सभागृहाच नात वेगळं आहे, असे म्हणत त्यांच्या वडिलांनी 30 वर्षे सभागृहात गाजवल्याची आठवण यावेळी सांगितली.

भाषणात शेवटी बोलताना, आज आपण सर्वांनी माझा जो बहुमान केला तो 12 कोटी लोकांनी दिलेला आशीर्वाद आहे, असे मी समजतो. मी या भूमीला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपल्याद्वारे वंदन करतो, अशा भावना गवई यांनी व्यक्त केल्या. तसेच मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रमाण माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राला अभिवादन केले. त्यांच्या भाषणाच्या या अनोख्या शेवटामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानपरिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, सर्व आमदारांनी आपापल्या आसनावरून उठून सरन्याधीशांप्रती सन्मान व्यक्त केला. पुढच्या काही मिनिटांपर्यंत टाळ्यांचा कडकडाट करत सर्वांनीच सरन्यायाधीश यांचे कौतुक केले. सरन्यायाधीशांनीही हात जोडून सर्वांचे आभार मानले.

मी नेहमीच स्वतःला भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे, मी 10 वी मध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली. विधी मंडळात माझ्या वडिलांचे 30 वर्षापेक्षा जास्त वर्षे प्रेमाचे नाते राहिले आहे, त्या विधी मंडळात माझा सत्कार हा न भुतो न भविष्यती असा क्षण आहे, असे म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते, ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा देशासाठी आपण एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांना 1947 मध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले, एक वर्षानंतर त्यांनी राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट सादर केला, बाबासाहेब म्हणाले माझ्या मते एकच घटना संपूर्ण देशासाठी चांगली आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल तर वन नेशन वन सिटीझन हे ठेवायला पाहिजे. फेड्रलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे, म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ कसा राहील यासाठी घटनेत प्रॉव्हीजन केले आहे, अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली. भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत, विधिपालिका न्याय पालिका आणि कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायदायचे पालन करण्याची जबाबदारी विधीपालिकेची आहे, न्याय व्यवस्था स्वतंत्र असावी दबाव तंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम कराव लागेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे ही मत असेच होते. 75 वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही, सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे. दोन महिला राष्ट्रपती झाल्या, दोन वेगवेगळ्या दलातील समुदायाच्या राष्ट्रपती झाल्याची आठवणही गवई यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर काम करायला मिळत आहे. एका संवैधानिक पदावर काम करणे म्हणजे घटनेवर काम करणे अभिप्रेत असते. कारण, रक्तहीन क्रांती करण्याची ताकद संविधानात आहे. संविधानात काम करणे ही तारेवरची कसरत असते , पण आपणास त्या आधारावरच काम कराव लागतं. नागपूर येथील झोपडपट्टी संदर्भात वकील म्हणून लढत होतो. देवेंद्रजी नागपूरचे स्थानिक आमदार होते. 22 वर्षांच्या कार्यकाळात बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आज माझा बहुमान केला, महाराष्ट्राच्या जनतेला वंदन करतो, असे म्हणत सरन्यायाधीशांनी राज्यघटनेचं महत्त्व आणि ताकद समजावून सांगितली.

Comments are closed.