मुंबई गोवा महामार्गावर दोन लाख झाडे लावल्याचा दावा फसवा, वृक्ष लागवड समितीचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षलागवडीला चालना मिळण्यासाठी चिपळुणातील वृक्ष लागवड हक्क समिती आंदोलने करीत असून वृक्ष लागवडीसाठी देखील स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी परशुराम ते झाराप दरम्यान सुमारे 2 लाख झाडे लावल्याचा लेखाजोखा मांडला. यावरून वृक्ष लागवड हक्क समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग जनतेची दिशाभूल करीत आहे. आज ही अनेक भागात खड्डे खोदाईचे काम सुरू नाही. पहिल्या रांगेत पंधरा ते अठरा फूटावर खड्डे मारले जात आहेत. वृक्ष लागवडीची फसवणूक करणे थांबवावे, असा इशारा शहानवाज शहा यांनी समितीच्या वतीने दिला आहे.

चिपळूण येथील वृक्ष लागवड हक्क समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभाग अंतर्गत परशुराम ते तळगाव (राजापूर टोक ) 241.300 ते 367.300 हा भाग येतो. या भागात शासनाने 1,15,616 इतक्या झाडांची अधिकृत कत्तल केल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी शासकीय जमिनीतील व खाजगी जमिनीतील मनाई आदेश असणारे वृक्षापैकी काही झाडे ज्यांची वनविभागाकडून परवानगी घेतलेली आहेत. तसेच खाजगी जमिनीतील ज्या झाडांचा मोबदला देण्यात आला यांची संख्या आहे. शासकीय जमिनीत जी बिगर मनाई आदेशाचे दहा वर्षांपासून २०० वर्ष जुनी झाडे होती, याची आकडेवारी दिलेली दिसून येत नाही. त्यांची वाहतूक परवान्या मध्ये संख्या आढळून येत नाही. शास्त्री पूल ते संगमेश्वर तसेच गोळवली येथे वड पिंपळ पायर असे मोठमोठे वृक्ष शासकीय जमिनीत होते. रत्नागिरी प्रभागात अंदाजे एकूण सात लाख वृक्ष तोड झाली असावी असा अंदाज आहे.

राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या दुतर्फा 90 हजार 235 व दुभाजका मध्ये 1 लाख 5 हजार 877 अशी एकूण 1 लाख 96 हजार 112 झाडे लावल्याचा दावा केला आहे. हा दावा पूर्णपणे फसवा आहे. ही आकडेवारी त्यांना त्यांच्या ठेकेदार एजन्सीने दिल्या प्रमाणे आहे. याची सत्यता संबंधित तांत्रिक सल्लागार किंवा विभागाकडून तपासलेली नाही. रस्त्याच्या दुतर्फा 90 हजार 235 झाडे लावल्याचा दावा करून पळ काढण्याचा प्रकार सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुरूप ज्या ज्या भागाच्या रस्त्याचे काम झाले, त्या त्या टप्प्यात वेळेत काम केले असते व तेथे त्याचवेळी पाच ते सात फूट उंचीची नियमानुरूप झाडे लावली असती तर, ती आज 20 फूटाची असती. झाडे लावताना कोणताही रीतसर खड्डा न मारता, कोणतीही सेंद्रिय सेंद्रिय खत न देता ती त्या वेळी अडीच ते तीन फूटाची लावण्यात आली. त्याची कोणतीही नीगा राखली गेली नाही. लावलेली झाडे आणि जगलेल्या झाडांची मोजणी करून तशी आकडेवारी समोर ठेवावी. झाडे जगविणे ही संबंधित एजन्सीची जबाबदारी असल्याचेही समितीचे शहानवाज शाह यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.