सध्या एअर स्पेस सुरक्षित नाहीत, राज्यांची स्वतंत्र प्रवास व्यवस्था धोकादायक; मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धजन्य स्थितीमुळे संबंधित देशात अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी केंद्रं सरकारशी समन्वय साधून काम सुरू आहे. युद्धजन्य स्थितीमुळे सध्या ‘एअर स्पेस’ सुरक्षित नसल्यामुळे राज्यांची स्वतंत्र व्यवस्था करणे गैरसोयीचे आणि धोकादायक ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विधान परिषदेत शिवसेना आमदार अॅड. अनिल परब, शशिकांत शिंदे आदींनी हा प्रश्न उपस्थित केला. या लोकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी अनिल परब यांनी केली. यावर युद्धजन्य देशांत अनेक भारतीय अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या माध्यमातून काम सुरू आहे. राजशिष्टाचार अधिकारी राजेश गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअॅप नंबर जाहीर करण्यात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Comments are closed.