अति डाव्या विचारसरणीची मानसिकता प्रस्थापित करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न – फडणवीस यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून देशाच्या सरन्यायाधीशांनी त्यांना भेटावे, अशी मागणी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. ज्या काँग्रेसला आणि राहुल गांधींचे नेतृत्व देशाने नाकारले, त्यांच्याकडून संविधान व संविधानिक संस्थांना नाकारले जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी अति डाव्या विचारसरणीची मानसिकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. त्यासाठी मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काँग्रेसने एक नवी नीती अवलंबली आहे, त्यांना अराजक निर्माण करायचे आहे. संविधान दाखवत ते संपवण्याचे षड्यंत्र काँग्रेसने रचले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

Comments are closed.