मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विजयसिंह मोहिते पाटील एकाच स्टेजवर येणार, नेमकं कारण काय?


माळशिरस: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) येत्या 15 ऑक्टोबर रोजी  एकाच स्टेजवर येत असून या वेळेला राज्याचे अनेक ज्येष्ठ मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथे असणाऱ्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग कारखान्यावर पुतळा अनावरण आणि गळीत विस्तारीकरण याचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत.

याशिवाय या सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती असणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदारांसमवेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे आणि विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील परिवार भाजपपासून दूर गेला होता. भाजप आणि मोहिते पाटील परिवारातील शीत युद्ध अनेक कार्यक्रमात समोर आले होते. यातच जिल्ह्याचे पालकमंत्री पद जयकुमार गोरे यांना दिल्यानंतर भाजप जिल्ह्यात आक्रमक झालेली दिसत आहे. अशातच भाजपच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी घेतलेल्या या कार्यक्रमात अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच फडणवीस आणि मोहिते पाटील हे एकाच स्टेजवर दिसणार असून कोण काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Devendra Fadnavis and Vijaysinh Mohite Patil:  कोणकोणते नेते असणार उपस्थित?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदारांसमवेत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे आणि विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.