Cm devendra fadnavis criticises rahul gandhi over increased voters in maharashtra assembly election in marathi


Devendra Fadnavis On Rahul Gandhi : नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतदार वाढल्यासंदर्भात राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा टीका केली आहे. त्यांची ही टीका म्हणजे आणखी एका फेक नरेटिव्हची तयारी असल्याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. (cm devendra fadnavis criticises rahul gandhi over increased voters in maharashtra assembly election)

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानिपत झाले. तर, लोकसभेत पराभूत झालेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो ना भविष्यती असा विजय मिळाला. त्यावरूनच महाविकास आघाडीने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे. लोकसभा ते विधानसभा निवडणूक यातील पाच महिन्यांच्या कालावधीत 39 लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली, हे मतदार कोण आहेत? या सर्वांचा तपशील आम्हाला द्या, अशी मागणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज, शुक्रवारी नवी दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : वाढलेल्या 39 लाख मतदारांचा तपशील द्या, राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी

या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ एका सेकंदात जी आकडेवारी उपलब्ध होते, ती आकडेवारी देण्यासाठी निवडणूक आयोग एवढा वेळ का घेत आहे, असा सवालही त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. नागपुरात ‘खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन’ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जोपर्यंत राहुल गांधी आत्मचिंतन करणार नाहीत, आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोवर त्यांना जनतेचे समर्थन मिळणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांच्या संख्येत तफावत होती, लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला तब्बल 39 लाख मतदार वाढले, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. त्याबाबत विचारले असता, हे मतदार कसे वाढले, कुठून आले, कोणाची नावे कापली, याची उत्तरे निवडणूक आयोगानेच दिली आहेत. त्यामुळे त्याचे वेगळे उत्तर देण्याची गरज नाही, असे सांगतानाच राहुल गांधी हे कव्हर फायरिंग करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Repo Rate : आरबीआयने रेपो दरात केलल्या कपातीमुळे गृहकर्जाच्या हप्त्यात किती बचत होणार? वाचा –

शनिवार, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत आपला पराभव होणार आहे, याची राहुल गांधी यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच या निकालानंतर काय बोलायचे आणि कसा नवीन नरेटिव्ह सेट करायचा, यासाठी ते हे कव्हर फायरिंग करत असल्याचे फडणवीस म्हणाले. मी राहुल गांधी यांना वारंवार हेच सांगतो आहे की, त्यांनी विधानसभेतील पराभवाचे आत्मचिंतन केले पाहिजे. आत्मचिंतन केले तरच त्यांची पार्टी टिकेल अन्यथा त्यांच्या पक्षाचे पुनरुज्जीवन होणे कठीण आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाल्यानेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जात नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे. ‘तोच तोच विनोद पुन्हा पुन्हा सांगितला तर तेव्हा आपण हसत नाही, असं ट्विटमध्ये करत गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.





Source link

Comments are closed.