CM Devendra Fadnavis directed the Commissioner of Police regarding 13 year old girl kidnapping and Murder incident at Kalyan PPK
कल्याण घटनेतील आरोपी विशाल गवळी याला फाशीची शिक्षाच होईल, हे सुनिश्चित करा, असे निर्देश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. बुधवारी फडणवीसांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधत निर्देश दिले आहेत.
कल्याण : राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही ठाणे जिल्ह्यात अशा घटना सर्वाधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील एका शाळेत तीन ते चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. ज्यानंतर या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेचे पडसाद कमी होत नाही तेच आता कल्याण येथे एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हृहय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेची मुख्यमंत्री, गृहंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेतली आहे, फडणवीसांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. (CM Devendra Fadnavis directed the Commissioner of Police regarding 13 year old girl kidnapping and Murder incident at Kalyan)
कल्याणमधील 13 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केलेला आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बुधवारी (ता. 25 डिसेंबर) बुलढाण्यातील शेगाव येथून सलूनमधून अटक केली. याबाबतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत थेट पोलीस आयुक्तांना फोन केला. तर, कल्याणमधील घटना गंभीर आहे. विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला अटक झाली आहे. त्यामुळे आता हा खटला जलदगती न्यायालयात चालवा. आरोपीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे थेट गृहमंत्री यांनीच आदेश दिल्याने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विशाल गवळी याच्यावर जलदगतीने कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आरोपी विशाल याला पोलिसांनी चोख बंदोबस्तात कल्याण कोर्टात हजर केले.
– Advertisement –
हेही वाचा… Satish Wagh Murder : सतीश वाघांच्या हत्येची सुपारी बायकोनेच दिली; धक्कादायक माहिती समोर
आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
आरोपी विशाल गवळी याला गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) सकाळी 11 वाजता कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाकडून त्याला 02 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच त्याची पत्नी साक्षी हिलासुद्धा सात दिवसांची म्हणजेच 02 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
– Advertisement –
काय आहे घटना?
कल्याणच्या चक्की नाका परिसरातून सोमवारी (ता. 23 डिसेंबर) 13 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. ही मुलगी खाऊ आणण्याकरिता जवळच्या दुकानात जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. आरोपी विशाल गवळी याने तिचे अपहरण करून तिला घरी नेले. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली. ज्यानंतर या नराधमाने कामावरून घरी आलेल्या पत्नीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या आरोपीच्या पत्नीने पतीच्या काळ्या कृत्याला लपविण्यासाठी त्याची साथ देत मुलीचा मृतदेह बापगाव येथे आणून फेकला.
मंगळवारी (ता. 24 डिसेंबर) सकाळी काही लोकांना मुलीचा मृतदेह बापगाव येथील गांधारी पुलाजवळ दिसला, ज्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाईला सुरुवात केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपी विशाल, त्याची बँकर पत्नी साक्षी यांनी रिक्षातून संबंधित मुलीचा मृतदेह बापगाव येथे आणून फेकल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी साक्षी गवळी हिच्यासह अनेकांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी विशाल गवळी हा त्याच्या पत्नीच्या माहेरी म्हणजे शेगावला जाऊन लपल्याची माहिती समोर आली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शेगावमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या होत्या.
Comments are closed.