CM Devendra Fadnavis important commentary on Ladki Bahin Yojana


जानेवारी महिन्यात तब्बल 5 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. याचे कारण असे ही, लाडकी बहीण योजना ही पडताळणीच्या फेऱ्यात अडकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांमध्ये या योजनेबद्दल संभ्रम असून लाडक्या बहिणींचे पैसे काढून घेणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर भाष्य केले आहे.

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री लाडकी योजना चालवली जाते. डिसेंबर महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या ही 2 कोटी 46 लाख इतकी होती. त्यामुळे जानेवारी महिन्यात तब्बल 5 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. याचे कारण असे ही, लाडकी बहीण योजना ही पडताळणीच्या फेऱ्यात अडकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांमध्ये या योजनेबद्दल संभ्रम असून लाडक्या बहिणींचे पैसे काढून घेणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेवर भाष्य केले आहे. (CM Devendra Fadnavis important commentary on Ladki Bahin Yojana)

माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, लाडकी बहीण योजनेत निकष लागण्याची शक्यता असल्याने महिला आपला अर्ज मागे घेत आहेत. पैसे परत द्यावे लागतील, अशी भीतीही महिलांच्या मनात आहे. याकडे कसे बघता? या प्रश्नावर ते म्हणाले की, कुठलाही नवीन निकष लागलेला नाही. योजना घोषित केली होती, त्यावेळी जे निकष होते, त्या निकषांपेक्षा ज्यांनी वेगळा अर्ज केला आहे त्यांच्यावर कारवाई होत आहे. मला आनंद आहे की, आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वत: निर्णय केला की, आम्ही निकषाबाहेर गेल्यामुळे ही योजना सोडत आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Nana Patole : तीन भावांची महाराष्ट्रातील लाखो बहिणींशी गद्दारी; नाना पटोलेंचा महायुतीवर निशाणा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणाचेही पैसे परत घेतले नाही आणि परत मागणारही नाही. पण आम्ही जनतेच्या पैश्याचे राखणदार आहोत. आम्हालाही महालेखा नियंत्रक म्हणजे सीजीएला उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहचत असेल, तर त्यावर सीजीएचा नक्कीच आक्षेप येणार आहे. त्यामुळे जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत, त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल आणि त्याची सुरुवात आम्ही केली आहे. तसेच कुठलेही नवीन निकष नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील कोट्यावधी महिलांच्या खात्यामध्ये एकूण 10 हजार 500 रुपये जमा झाले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील काही निकष बदलले गेल्याची चर्चा आहे. तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे राज्यातील अनेक महिलांच्या मनात धास्ती आहे. तसेच पडताळणीत अपात्र ठरल्यास राज्य सरकारकडून कारवाई करण्यात येईल, या भीतीने अनेकांनी योजनेचा लाभ नको असे सांगत आपले अर्ज मागे घेतले आहेत.

हेही वाचा – Delhi Assembly Results : उमेदवाराचे आयुष्य निष्कलंक पाहिजे, अण्णा हजारेंचा केजरीवालांवर निशाणा



Source link

Comments are closed.