CM Devendra Fadnavis on aurangzeb tomb and MP Udayanraje Bhosale Statement


मुंबई : काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत विधान केले होते. ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असे त्यांनी विधान केल्यानंतर याचे पडसाद फक्त राज्यातच नव्हे विधानसभेतही उमटले. यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. यानंतर आता अनेक संघटनांनी तसेच नेत्यांनी औरंगजेब आणि त्याच्या कबरीबाबत अनेक विधाने केली आहेत. नुकतेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे,’ असे विधान केले होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (CM Devendra Fadnavis on aurangzeb tomb and MP Udayanraje Bhosale Statement)

हेही वाचा : Uday Samant : महामार्गावरील खड्ड्यांच्या पॅचवर्कमध्ये घोळ, घोटाळा करणारी कंपनी सामंत यांच्या वडिलांची? 

औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, “आम्हालाही प्रत्येकाला असेच वाटते. फक्त काही गोष्टी या कायद्याने कराव्या लागतात. कारण ती कबर संरक्षित असून काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एएसआयचे (ASI) संरक्षण मिळालेले आहे,” असे म्हणत त्यांनी मोजक्या शब्दात आपली भूमिका मांडली. त्यामुळे आता याचे पुढे राज्य सरकार कारवाई करणार का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, “औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचे या महाराष्ट्रात उदात्तीकरण आणि दैवतीकरण सुरू आहे. इथे उरूस भरवले जात असून हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे प्रकार कायमचे रोखण्यासाठी औरंगजेबाची ही कबरच उखडून टाकली पाहिजे,” असे विधान त्यांनी केले होते. तसेच, त्याआधी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले की,”सध्या चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असे मी मानत नाही” त्यांच्या याच विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते.



Source link

Comments are closed.