CM Devendra Fadnavis on PM Awas Yojana in Maharashtra asj


पुणे : “आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरे मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आले आहे. आता अतिरिक्त 13.60 लाख घरे देण्यात येणार आहेत. म्हणजेच एका वर्षात जवळपास 20 लाख घरे केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील गरीब जनतेसाठी, बेरोजगारांसाठी, गरजूंसाठी बांधण्यात येणार आहेत. आजच कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याबाबत घोषणा केली आहे. मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही भेट आहे. ” अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोमवारी (23 डिसेंबर) पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय किसान दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. (CM Devendra Fadnavis on PM Awas Yojana in Maharashtra)

हेही वाचा : Nana Patole : मुख्यमंत्र्यांवर प्रिविलेज मोशन आणणार; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी पटोले यांचा इशारा 

– Advertisement –

“देशाच्या इतिहासात कोणत्याच राज्याला एका वर्षात इतकी घरे मिळालेली नाहीत. आवास योजनेसाठी 26 लाख लोकांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. त्यामुळे याचा चांगला फायदा होणार आहे. यातून जे घरे मिळण्यापासून वंचित राहतील, त्यांना पुढच्या वर्षी संधी देणार आहोत. तसेच, पूर्वी सर्वाक्षणात जे निकष होते, ते देखील सौम्य करण्यात आले आहेत. जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो किंवा महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणात सर्वांना सामावून घेण्यात येणार आहे. ही जी यादी बनेल, त्यांना येत्या 5 वर्षांत घरे द्यायची हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी सुमारे 20 लाख घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली. यावेळी कार्यक्रमात ते म्हणाले की, “प्रत्येक गरिबाकडे स्वतःचे पक्के घर असले पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यावेळी ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.