CM Devendra Fadnavis on Rahul Gandhi Parbhani Visit urk


पुणे – काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परभणी भेटीवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांची ही राजकीय भेट होती. जाती-जातीमध्ये भेद निर्माण करण्याचे काम ते करत असतात. परभणी प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी घोषित केली आहे. त्यात सत्य बाहेर येईल. त्यात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले तर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. यावेळी त्यांना राहुल गांधी यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतले, तुम्ही सभागृहात खोटी माहिती दिली असा आरोप त्यांनी केला, असे विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे राजकारण करत आहेत. त्यांची ही राजकीय भेट आहे. जाती-जातींमध्ये भेद निर्माण करण्याची काँग्रेसचे जूनचे काम आहे. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला याची न्यायालयनी चौकशी जाहीर करण्यात आली आहे. त्यामधून सत्य बाहेर येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

– Advertisement –

कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे…

राहुल गांधी यांना महाराष्ट्र कळालेला नाही. राहुल गांधी यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? असा हल्लाबोल माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

राहुल गांधींच्या परभणी भेटीवरुन राणेंनी टीका केली. राहुल गांधी हे निळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये परभणीत पोहोचले होते. त्यावरुन राणेंनी टीका केली. ते म्हणाले, कपड्याचा रंग निळा असला म्हणजे कोणी आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं, असा हल्लाबोल यावेळी नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

– Advertisement –

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. ज्यांनी ही हत्या केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचे सांगत तेही याप्रकरणी तितकेच जबाबदार आहेत असे म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा ही संविधानाला संपवण्याची आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेणे यात कोणतेही राजकारण नाही. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : Rahul Gandhi : सोमनाथ सूर्यवंशींची पोलिसांकडून हत्या करण्यात आली; राहुल गांधींची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरही टीका

Edited by – Unmesh Khandale



Source link

Comments are closed.