CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24
नव्या महायुती सरकारच्या काळात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौरा करणार आहेत. येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत.
मुंबई : मागील महायुती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना दावोसचा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. कारण मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात अनेक कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. विशेष म्हणजे उद्योग महाराष्ट्रात आले नाही पण मंत्री दावोसची पिकनीक करत असल्याचाही आरोपी विरोधक करत होते. मात्र नव्या महायुती सरकारच्या काळात प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौरा करणार आहेत. येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. (CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24)
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असणार आहे. डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाला चालना देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यातून प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्यातून केला जाणार आहे. तसेच, या दौऱ्यातून रोजगारनिर्मितीकडे ही अधिकचे लक्ष दिले जाणार आहे. राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौर्यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्यात 2014-2019 या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौर्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम दावोस दौर्यात असणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री घेणार आहेत. या दौर्यात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असणार आहेत.
हेही वाचा – Saif Ali Khan Attack Update : पोलिसांच्या 35 तुकड्या पण Data Dump तंत्रज्ञान आलं कामी; ‘असा’ पकडला आरोपी
Comments are closed.