माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान

माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे भर विधान परिषदेत मोबाईलवर जंगली रमी खेळण्यात रमले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकाराबद्दल कृषिमंत्र्यांवर चारही बाजूने टीका होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे.

याप्रकरणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “विधानसभेत ज्यावेळी चर्चा चालते, तेव्हा आपलं कामकाज नसलं तरीही, त्याठिकाणी गंभीरपणे बसणं गरजेचं आहे. साधारपणे एखाद्या वेळी असं होतं की, तुम्ही कागदपत्रे वाचता, इतर गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा निश्चित योग्य नाही. त्यांनी त्या ठिकाणी खुलासा दिला आहे की, मी रमी खेळत नव्हतो. अचानक ती पॉपअप झाली. त्यांनी जरी असं सांगितलं असलं तरी, एकूण जे घडलं आहे, ते आम्हाला भूषणावह नाही.”

Comments are closed.