CM Fadnavis in Nashik Shirdi BJP Maharashtra in marathi asj


नाशिक : शिर्डीमध्ये भाजपचे महा अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित करत, साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे, तर शेवटी मी ही सबुरी आहे. हा मंत्र आपण सगळे सातत्याने आपल्या जीवनात पाळत असतो. ज्यांना हा मंत्रा समजला ते यशस्वी झाले. तर ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समाजाला नाही, त्यांची वाईट परिस्थिती झाली. हे आपण विधानसभेत पाहिले.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. (CM Fadnavis in Nashik Shirdi BJP Maharashtra)

हेही वाचा : Bawankule : “फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले, तेव्हा डोळ्यात पाणी आलं”, बावनकुळेंचं वक्तव्य 

– Advertisement –

“आपली कार्यकारिणीची बैठक ही संक्रमणाच्या पर्वात होत आहे. म्हणजेच मकर संक्रमण संपवून महाकुंभाचे पर्व आपल्या देशात सुरू होत आहे. महाकुंभाचे अमृत हे पुन्हा एकदा मिळवण्यासाठी हजारो लोकं महाकुंभात एकत्रित होणार आहेत. आपल्याला मिळालेल्या महाविजयाचे अधिवेशान आपण करत आहोत. मला आनंद आहे की, महाराष्ट्रातील जनतेने एकदा नव्हे तर तीनवेळा 100 हून अधिक जागा याठिकाणी दिल्या आहेत. गेल्या 30 वर्षांच्या राज्याच्या इतिहासात जर 100 हून अधिक जागा मिळवणारा पक्ष हा भाजप आहे. भाजपने सलग तीनदा विजय मिळालेल्या गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड आणि हरयाणा या राज्यांच्या यादीत आता महाराष्ट्रदेखील जोडला गेला आहे.” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 48 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे जेमतेम 35 टक्के मिळवून आपण काठावर पास झालो होतो. पण मनातून मात्र नापास होतो. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपण जे काही प्रयत्न केले, जो विश्वास आपण तयार केला. त्यानंतर विधानसभेत 288 पैकी 237 जागा जिंकून तब्बल 82 टक्के तर एकट्या भाजपने 89 टक्के गुण मिळवले आणि महाराष्ट्राचा एक नवा इतिहास आपण बनवला.” असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेच्या यशाचे श्रेय हे जनतेला दिले. तसेच यावेळी त्यांनी महाभारताचा संदर्भ देत विजयाचा शिल्पकार कोण? याबाबत विधान केले. “निवडणुकीच्या युद्धात लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी पार्थाची किंवा केशवाची भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी निभावली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी माधव होते. केशव आणि माधवामुळे हा विजय मिळवता आला. त्यामुळे हा विजय भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुमचे आभार मानतो.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.



Source link

Comments are closed.