CM Fadnavis on CM ship and Eknath Shinde in Jivhala Award in Nagpur asj
नागपूर : नुकताच नागपुरात जिव्हाळा पुरस्कार पार पडला. यावेळी महत्त्वाचे आकर्षण राहिले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत. प्रसिद्ध वक्ते आणि प्रवचनकार विवेक घळसासी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्रिपद स्वीकारताना आणि त्याच्या आधी काय घडलं? याबाबत अनेक बाबींचा उलगडा केला. (CM Fadnavis on CM ship and मराठी in Jivhala Award in Nagpur)
हेही वाचा : Manoj Jarange Patil : जरांगेंना तातडीने रुग्णलायात केले दाखल; डॉक्टरांकडून सिटी स्कॅनचा सल्ला
– Advertisement –
मुलाखतकार विवेक घळसासी यांनी, ‘एकनाथ शिंदे बदल स्वीकारताना त्रास झाला असेल, मग ती यातना कशी होती?’ यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे खर आहे की, साधारणपणे शिंदेंना ते स्वतः मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. कारण, गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री होते. मलादेखील कधी असे वाटले नव्हते की मी मुख्यमंत्री होईन. जनतेने भाजपला 132 जागांवर विजय मिळवून दिला. त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री न करणे, हे जनतेला आणि पक्षातील कार्यकर्त्यांनाही आवडले नसते. म्हणून आमच्या वरिष्ठ नेतृत्वाने एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. यावेळी एका मिनिटात सांगितले होते की, मला हे कळते की भाजपच मोठा पक्ष असून मुख्यमंत्री त्याचाच झाला पाहिजे.” असे सांगत त्यांनी निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांचे विश्लेषण केले.
माध्यमांमध्ये चर्चा पण…
“महायुतीत एखादा निर्णय हा चर्चा करून घेतला जातो. त्यावेळी म्हणून आम्हाला निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागला. माध्यमांमध्ये अनेक चर्चा त्या कालावधीत रंगल्या होत्या. कधी एकनाथ शिंदे नाराज, कधी अजित पवार नाराज अशा चर्चा होत होत्या. यामध्ये माध्यमांही दोष देता येत नाही. त्यांना 24 तास सर्व काही चालवायचे आहे. त्यामुळे कधी बातम्या बनवाव्या लागतात. पण मला असं काही वाटत नाही. त्यांनी काहीही अटी समोर ठेवल्या नाहीत. त्यांनी तत्काळ निर्णय घेतला.” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यापुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ” एकनाथ शिंदेंसमोरही उपमुख्यमंत्री व्हावे की नाही? हा प्रश्न होताच. मी त्यांना माझा अनुभव सांगितला. तुम्हाला एक पक्ष चालवायचा आहे. तुमचा पक्ष असा आहे की, तुम्ही सत्तेत असणे गरजेचे होते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून काही उपयोग नाही. माझ्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते. पण एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर फार क्वचितच हास्य असते. पण मुख्यमंत्री असताना त्यांना नाराज असल्याचे वगेरे काही प्रश्न विचारण्यात आले नव्हते.” असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले.
Comments are closed.