पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल स्पर्धेत फातिमा इलेव्हन, युकेएम कोथरूड एफसी संघांची विजयी आगेकूच
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत फातिमा इलेव्हन, यूकेएम कोथरूड एफसी, आयफा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली. बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या लढतीत मोहम्मद जहांगीरदार(2 मि), मोहम्मद सय्यद (43 मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने रिअल पुणे युनायटेड एफसी संघाचा 2-0 असा पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात यूकेएम कोथरूड एफसी संघाने परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब संघावर 4-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विजयी संघाकडून शौर्यजीत राठोड (29 मि) याने दोन गोल तर शुभम भोसले (45 मि), मोहम्मद आतिफ (55 मि) याने एके गोल केला. अन्य लढतीत आयफा संघाने न्यू इंडियन सॉकर क्लब संघाचा 5-0 असा धुव्वा उडवला. आयफा संघाकडून रियान यादगिरी(7,67मि.) ने दोन गोल , याह्या शेख(22मि.), अबुबकर मणियार(55 मि ), शाहिद खान(62 मि) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
निकाल: साखळी फेरी:
फातिमा इलेव्हन: 2 (मोहम्मद जहांगीरदार 2मि., मोहम्मद सय्यद 43 मि.) वि.वि.रिअल पुणे युनायटेड एफसी: 0,
यूकेएम कोथरूड एफसी: 4 (शौर्यजित राठोड 3,29 मि., शुभम भोसले 45 मि., मोहम्मद आतिफ 55 मि.) व्ही. परशुरामियन्स स्पोर्ट्स क्लब: 0,
आयफा (AIFYA): 5(रायान यादगिरी ७,६७ मी, याह्या शेख २२ मी, अबुबकर मणियार ५५ मी, शाहिद खान ६२ मी) व्हीव्ही न्यू इंडियन सॉकर क्लब:
Comments are closed.