धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, CJP पुण्यानंतर आता देशातील सहा शहरात करणार आंदोलन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॉक्रोच जनता पार्टीने पुण्यानंतर आता देशातील सहा शहरात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यात लखनौ, अमृतसह, हैदराबाद, बंगळुरू , जयपूर आणि दिल्ली या शहरात आंदोलन करणार आहे. त्यांच्या कॉक्रोच इज बॅक या अधिकृत X हँडलवरून ही माहिती दिली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आता संपूर्ण देश एकजूट होईल. पुण्यानंतर आता लखनौ, अमृतसह, हैदराबाद, बंगळुरू , जयपूर आणि दिल्ली या शहरात आंदोलन करणार आहे. दिल्लीतील आंदोलनासाठी 20 जूनला देशभरातील तरुणांनी दिल्लीला यावे, असे आवाहन CJP कडून करण्यात आले आहे.

दरम्यान पुण्यात गुरुवारी पार पडलेल्या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक देखील आलेले. यावेळी बोलताना कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे सांगितले आहे.

या ठिकाणी होणार आंदोलनं –
१२ जून – लखनौ – सकाळी ११.
13th जून – अमृतसह – संध्याकाळी 4 वा.
14th जून – हैदराबाद – सकाळी 10 वा.
14th जून – बंगळुरू – संध्याकाळी 4 वा.
15th जून – जयपूर – दुपारी 3 वा.
20 जून – दिल्ली

Comments are closed.