Viral Infection : बदलत्या ऋतूत सर्दी-खोकल्याचा त्रास?
जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोविड 19ची काही प्रकरणे हॉंगकॉंग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये आढळली आहेत. आता भारतातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणात होणाऱ्या सर्दी-खोकल्यालानेही अनेकांची घाबरगुंडी उडत आहे. हवामानात होणाऱ्या या बदलांमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. उष्ण हवामानाचे रूपांतर अचानक दमट वातावरणात झाल्याने अनेक संसर्गजन्य आजार डोके वर काढत आहेत. यातही सर्दी-खोकला आणि तापाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. खरं तर, बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसाठी कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती जबाबदार असते. त्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. आज आपण बदलत्या ऋतूत होणाऱ्या सर्दी-खोकल्याच्या त्रासावर प्रभावी ठरतील असे उपाय पाहणार आहोत.
घरगुती उपाय –
- सर्वात सोपा उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ घेतल्याने बंद नाक उघडते. या पाण्यात तुम्ही निलगिरीचे तेल, लवंगाचे तेल टाकू शकता. झोपण्याआधी काही दिवस सतत हा उपाय केल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होऊ शकेल.
- डोळ्यांतून येणारे पाणी, वाहणारे नाक यावर तुम्ही काळी मिरी, सुपारी, तुळशी आणि सुंठ याचे सेवन करायला हवे. यासाठी एका भांड्यात दोन ग्लास पाणी घेऊन त्यात सुपारी, तुळशीची पाने, काळी मिरी, सुंठ घालून 10 मिनिटे उकळवून घ्या. पाणी गाळून घ्या आणि प्या.
- घसा खवखवत असेल तर मिठाच्या पाण्याने गार्गल करा. खोकला जाईपर्यत दिवसातून तीन ते चार वेळा मिठाच्या पाण्याने गार्गल करू शकता.
- सर्दी-खोकल्याच्या त्रासावर मधाचा चहा पिणे फायद्याचे ठरेल. यासाठी 2 चमचे मध कोमट पाण्यात टाकून प्या. किंवा कोणत्याही हर्बल टी मध्ये मध टाकून प्यायला हवे.
- जर तुम्हाला सर्दी-खोकला आणि घसादुखीचा त्रास असेल तर दिवसभरात कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
- हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. कोरड्या खोकल्याची समस्या काही दिवसातच नाहीशी होईल.
हेही पाहा –
Comments are closed.