कोल्ड्रिफ खोकला सिरप कंपनीच्या मालकाने अटक केली

मध्यप्रदेश पोलिसांनी रंगनाथनला ठोकल्या बेड्या

वृत्तसंस्था/चेन्नई

मध्यप्रदेशात कोल्डरिफ सिरपचे सेवन केल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता संबंधित  सिरप कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. श्रीसन फार्मास्युटिकलचे मालक रंगनाथन गोविंदन यांना बुधवारी रात्री उशिरा अत्यंत गोपनीय मोहिमेदरम्यान पकडण्यात आले. रंगनाथन हे अनेक दिवसांपासून भूमिगत होते आणि पोलिसांना चकवा देत होते. रंगनाथन यांच्या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनानंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानात अनेक मुलांना जीव गमवावा लागला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशांनतर पोलिसांनी  कंपनीविरोधात गुन्हा नोंदविला होता. कोल्डरिफ कफ सिरपमध्ये एका रसायनाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होते, याच्या साइट इफेक्टमुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानात अनेक मुलांचे अवयव निकामी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलांचा मृत्यू झाल्याचे कळताच रंगनाथन आणि त्यांची पत्नी फरार झाली होती. अटकेनंतर रंगनाथन यांना कांचीपुरम येथील श्रीसन फार्मा कंपनीत नेण्यात आले, तेथून महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. चेन्नईत ट्रान्झिट रिमांड मिळविल्यावर रंगनाथन यांना चौकशीसाठी छिंदवाडा येथे आणले जाणार आहे.

Comments are closed.