CPL 2025 मध्ये या खेळाडूने केली शतके झळकावण्यात सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिलची बरोबरी

कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 च्या चौथ्या सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना ट्रिनबागोने 20 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात 231 धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाया न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज कॉलिन मुनरो याने रचला. त्याने केवळ 57 चेंडूत तडाखेबाज 120 धावा ठोकल्या. या शतकासह मुनरोने सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांच्या टी20 शतकांच्या बरोबरीत स्थान मिळवलं.

मुनरोच्या या खेळीने त्याच्या टी20 करिअरमधील सहावं शतक पूर्ण झालं आहे. यामुळे तो न्यूझीलंडसाठी या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मार्टिन गुप्टिलसोबत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर 7 शतकांसह ब्रँडन मॅकुलम कायम आहेत.

मुनरोच्या 120 धावांची खेळी CPL इतिहासातील तिसरी सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या ठरली. या यादीत 132 धावांसह ब्रँडन किंग पहिल्या, तर नाबाद 121 धावांसह आंद्रे रसेल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मुनरोने आपलं शतक फक्त 50 चेंडूत पूर्ण केलं आणि 14 चौकार व 6 षटकार ठोकले.

Comments are closed.