IND vs PAK: कोलंबोच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट; पाकिस्तानला दिलासा, तर टीम इंडियाही रणनीती बदलणार?

श्रीलंकेत होणाऱ्या भारत-पाकिस्तान (Icc T20 international world cup 2026 IND vs PAK) महामुकाबल्यापूर्वी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टीचा (Pitch) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या खेळपट्टीबाबत एक असा खुलासा झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी संघ सध्या खूप आनंदी आहे.

भारत आणि पाकिस्तानचा सामना त्याच खेळपट्टीवर होणार आहे, ज्यावर नुकताच ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना झाला होता. ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे सामन्यात फलंदाजांना धावा काढताना प्रचंड त्रास झाला होता आणि गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारत-पाक सामना देखील ‘लो स्कोरिंग’ (कमी धावांचा) होण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 5 फिरकीपटूंना (Spinners) स्थान दिले आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्याने, या 5 स्पिनर्सच्या जोरावर भारताला रोखता येईल, अशी पाकिस्तानला आशा आहे.

पाकिस्तानी फिरकीपटूंचे आव्हान आणि खेळपट्टीचा स्वभाव पाहून भारतीय संघही मोठा बदल करू शकतो. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात थेट स्थान मिळू शकते. फलंदाज रिंकू सिंगच्या (Rinku Singh) जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचा समावेश होऊ शकतो. भारतीय संघ सुद्धा या सामन्यात 4 फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

Comments are closed.