सामान्य लोकांना आता लष्कराच्या 'ध्रुव-एनजी' हेलिकॉप्टरमधून प्रवास करता येणार आहे

केंद्रीय विमानो•ाण मंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा : वैद्यकीय आणीबाणी, पर्यटन अन् आपत्तींच्या काळात होणार वापर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय विमानोड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी नेक्स्ट जनरेशन सिव्हिल हेलिकॉप्टर ध्रूव एनजीला हिरवा झेंडा दाखविला आहे. हे हेलिकॉप्टर हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) निर्माण केले आहे. एचएएलमधून उड्डाण करण्यापूर्वी नायडू यांनी हेलिकॉप्टरची प्रणाली आणि वैशिष्ट्यो वैमानिकाकडून जाणून घेतली. ध्रूव-एनजी हेलिकॉप्टरमधून आता सामान्य नागरिकांनाही प्रवास करता येणार आहे.

ध्रूव एनजी हे 5.5 टन वजनाचे असून यात हलेक ट्विन-इंजिन, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर असून ते भारतीय भूभागाची विविधता आणि अवघड आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

ध्रूव हेलिकॉप्टर आतापर्यंत केवळ सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करत राहिले आहे. आता सामान्य नागरिकही यातून प्रवास करू शकणार आहेत. याचा उद्देश वैद्यकीय आणीबाणी, पर्यटन, दुर्गम भागांची संपर्कव्यवस्था आणि आपत्ती बचावकार्याच्या क्षेत्रांमध्ये हेलिकॉप्टर सेवांना वाढविणे आहे. यापूर्वी भारतीय सैन्य ध्रूव हेलिकॉप्टरचा पर्वतीय, वाळवंटी आणि सागरी भागांमध्ये स्वत:च्या अभियानासाठी वापर करत होते.

हेलिकॉप्टर बाजारपेठ

वेगाने वाढणाऱ्या सिव्हिल आणि युटिलिटी हेलिकॉप्टर बाजारपेठेवर एचएएल लक्ष देत आहे. एअर अॅम्ब्युलेन्स, ऑफशोर ऑपरेशन्स, आपत्ती बचावकार्य आणि क्षेत्रीय संपर्कव्यवस्था यासारख्या क्षेत्रांमध्ये हेलिकॉप्टरची मागणी वाढत आहे. हे पाहता सरकारी एअरोस्पेस कंपनी सैन्य प्लॅटफॉर्मच्या पुढे स्वत:च्या कक्षेचा विस्तार करू पाहत आहे. ध्रूव-एनजीच्या पहिल्या उ•ाणाला भारताच्या स्वदेशी रोटरी-विंग विमान कार्यक्रमात एक मोठी कामगिरी मानण्यात येत आहे. तसेच याला नागरी उ•ाण बाजारात एचएएलच्या दीर्घ रणनीतिच्या दिशेत एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जातेय.

भारतात सिव्हिल हेलिकॉप्टरची संख्या कमी

भारतात सिव्हिल हेलिकॉप्टरची संख्या अत्यंत कमी आहे. पूर्ण देशात सध्या सुमारे 300-400 सिव्हिल हेलिकॉप्टरच संचालित होत आहेत. याच्या तुलनेत अमेरिकेत 12000 हून अधिक सिव्हिल हेलिकॉप्टर आहेत. ब्राझीलसारख्या कमी लोकसंख्येच्या देशातही जवळपास 2500 हेलिकॉप्टर्स आहेत. तर चीनमध्ये 1200 हून अधिक सिव्हिल हेलिकॉप्टर्स काम करत आहेत. मोठी लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार पाहता भारतात या क्षेत्राची वाढ होण्याची मोठी शक्यता आहे.

पोल-एनजी

एचएएलचे नेक्स्ट जनरेशन सिव्हिल हेलिकॉप्टर

वजन 5.5 टन

गाठता येणार उंची         6 हजार मीटर

कमाल वेग      285 किमी-प्रतितास

इंजिन               ट्विन पॉवर 1एच1सी इंजिन

उड्डाणकक्षा  630 किमी (20 मिनिटांच्या रिझर्व्ह इंधनासोबत एकाचवेळी उड्डाण)

कॉकपिट                   अॅडव्हान्स ग्लास कॉकपिट

Comments are closed.