हिंदुस्थानचा राष्ट्रकुल स्पर्धेत ‘गोल्डन’ धमाका! एका दिवसात चार सुवर्णपदकांची कमाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

समोआमधील अपिया येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा व ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धा तसेच युनिव्हर्सल कपमध्ये (वरिष्ठ) हिंदुस्थानी वेटलिफ्टर्सनी दमदार कामगिरी करत दुसऱ्याच दिवशी चार सुवर्णपदकांची लयलूट केली.

सुनील सिंहने पुरुष 65 किलो गटात एकूण 271 किलो वजन उचलत (स्नॅच 126 किलो, क्लीन अॅण्ड जर्क 145 किलो) सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या 58 किलो गटात ऐसांगफा गोगोई हिने एकूण 185 किलो (स्नॅच 79 किलो, क्लीन अॅण्ड जर्क 106 किलो) वजन उचलत सुवर्णपदक मिळवले तसेच पुरुष 71 किलो गटात अभिनव गोगोई याने 284 किलो (स्नॅच 129 किलो, क्लीन अॅण्ड जर्क 155 किलो) वजन उचलत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. युनिव्हर्सल कपमध्ये अरुणाचल प्रदेशच्या चारू पेसी याने पुरुष 65 किलो गटात 289 किलो (स्नॅच 127 किलो, क्लीन अॅण्ड जर्क 162 किलो) वजन उचलत हिंदुस्थानला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱयांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, ही कामगिरी खेळाडूंच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक असून जागतिक वेटलिफ्टिंग क्षेत्रात हिंदुस्थान मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहे.

Comments are closed.