झुरळ जनता पक्षाविरोधात तक्रार दाखल.

नवी दिल्ली  :

कॉक्रोच जनता पक्षाच्या विरोधात दिल्लीत तक्रार सादर करण्यात आली आहे. या संघटनेने शनिवारी दिल्लीत निदर्शनांचे आयोजन केले. साधारणत: पाच तास ही निदर्शने चालली. ती शांततेत पार पडली. त्यानंतर ही तक्रार सादर करण्यात आली आहे. ही संघटना देशविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेली आहे, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. ही तक्रार दिल्लीतील काही नागरीकांनी सादर केल्याची माहिती देण्यात आली आहे. या संघटनेला देशविरोधी शक्तींकडून पैसा पुरविला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे या संघटनेची सखोल चौकशी केली जावी, असे प्रतिपादन या तक्रारीत करण्यात आले आहे. अभिजित दिपके हा या या संघटनेचा संस्थापक असून या संघटनेचे नाव कॉक्रोच जनता पार्टी असे असले तरी प्रत्यक्षात तो नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्ष नाही. त्याचे आतापर्यंतचे स्वरुप केवळ एक आभासी संघटना असेच आहे. सोशल मिडीयावर या आपले कोट्यावधी फॉलोअर्स आहेत, असे या पक्षाचे म्हणणे आहे. अभिजित दिपके हा नुकताच अमेरिकेहून भारतात परत आलेला आहे. त्याच्या संघटनेचा हा भारतातील प्रथमच कार्यक्रम होता. सोनम वांगचुक त्याच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या संघटनेची पुढची पावलांविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

 

Comments are closed.