एकही चेंडू न टाकता दिल्या 8 धावा! पाकिस्तानी गोलंदाजाचा क्रिकेट इतिहासातील 'तो' लाजिरवाणा विक्रम
टी-20 च्या युगात गोलंदाजांना भरपूर धावा पडणे ही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. वनडेमध्येही आतापर्यंत 21 वेळा गोलंदाजांनी 100 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. मात्र, एक विक्रम असा आहे जो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा विचित्र रेकॉर्ड पाकिस्तानचा फिरकीपटू अब्दुर रहमान (Abdur Rahman) याच्या नावावर आहे.
तुम्ही विचार करत असाल की एकही चेंडू (लिगल डिलिव्हरी) न टाकता धावा कशा दिल्या जाऊ शकतात? गोलंदाजाने एखादा वाईड किंवा नो-बॉल टाकला तरी तो एक चेंडू तर फेकतोच. पण अब्दुर रहमानने चेंडू हातातून न सुटताच किंवा चेंडू पूर्ण न होता 8 धावा दिल्या.
ही घटना 2014 च्या आशिया चषकात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात घडली. बांगलादेश फलंदाजी करत असताना पाकिस्तानतर्फे 11 वे षटक टाकण्यासाठी अब्दुर रहमान आला. त्याने पहिला चेंडू टाकला जो हातातून निसटला आणि कमरेच्या वर गेला. पंचांनी याला ‘नो-बॉल’ दिले. त्यानंतर त्याने पुन्हा चेंडू टाकला, तो देखील कंबरेच्या वर ‘फुल टॉस’ (बीमर) होता. या चेंडूवर फलंदाजाने एक धाव घेतली आणि पंचांनी पुन्हा ‘नो-बॉल’ दिला. नियमानुसार एखादा गोलंदाज दोन ‘बीमर’ टाकू शकतो, पण पंचांनी त्याला तिसरी संधी दिली. मिळालेल्या तिसऱ्या संधीतही रहमानने तीच चूक केली. पुन्हा एकदा कंबरेच्या वर चेंडू फेकला, ज्यावर फलंदाज अनामुल हकने चौकार मारला. पंचांनी याला नो-बॉल घोषित केले आणि सलग तीन चुकांमुळे रहमानला गोलंदाजी करण्यापासून रोखले (Match suspend केले)., अशा प्रकारे, त्याने एकही वैध चेंडू न टाकता 8 धावा दिल्या.
अब्दुर रहमानने 2007 ते 2014 दरम्यान पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळले त्याने कसोटीमध्ये 22 सामन्यांत 99 बळी घेत 395 धावा केल्या आहेत. तर वनडेतील 31 सामन्यांत 30 बळी घेत 142 धावा केलेल्या आहेत आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 8 सामन्यांमध्ये त्याने 11 बळी घेतले आहेत.
Comments are closed.