केकेआरच्या गोटात चिंतेचे वातावरण; दिग्गज खेळाडूचे मोठे विधान, म्हणाला…

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आगामी हंगामातही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत ३ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळे यावेळी हा संघ चौथ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेल्या हंगामापेक्षा या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आणखी मजबूत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण चेन्नई सुपर किंग्ज संघातील माजी खेळाडू फाफ डू प्लेसिसने कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमकुवत बाजू सांगितली आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपला संघ संतुलित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण तरीदेखील फाफ डू प्लेसिसने कोलकाता नाईट रायडर्स संघावर प्रश्न उपस्थित केले आहेत. डू प्लेसिस म्हणाला, “कोलकाताच्या गोलंदाजी आक्रमणावर प्रश्नचिन्ह आहे. त्यांचे गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या सर्वात अनुभवी खेळाडूला मैदानात उतरावावं लागणार आहे. त्यांच्याकडे जगातील २ उत्तम फिरकी गोलंदाज आहेत, जे त्यांना चॅम्पियन बनवू शकतात. वरूण आणि नरेनला दमदार गोलंदाजी करावी लागणार आहे.”

संघाची गोलंदाजी ही कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. कारण टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील पहिल्या सामन्याआधीच हर्षित राणा दुखापतग्रस्त झाला होता. पण तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. त्यामुळे हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे. तर मथीशा पथिराना देखील स्पर्धेबाहेर होऊ शकतो. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आयपीएलमध्ये खेळणार नाही, हे तर निश्चित आहे. त्यामुळे वैभव अरोरावर मोठी जबाबदारी असणार आहे.

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली होती. यावेळीही संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रहाणेकडे असणार आहे. गेल्या हंगामात हा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी होता. यावेळी कोलकाताने मिनी ऑक्शनमध्ये स्टार खेळाडूंवर बोली लावली आहे. त्यामुळे यावेळी कोलकाताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Comments are closed.