सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक
ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालेले आहे. त्यांचे पार्थिव मूळ गावी बीड येथे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी त्यांच्यावर (३ एप्रिल) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सध्या तुकाराम मुढे हे पश्चिम बंगालमध्ये असून, ही माहिती मिळताच ते तडक पुण्याला येण्यासाठी रवाना झाले आहेत. मुंढेच्या आईचे वय हे शंभरीच्या जवळपास असल्याची माहिती मिळत आहे अशी माहिती मुंढे कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
Comments are closed.