काँग्रेस-सीजेपी एकमेकांवर टीका करतात

आसाममधील काही घटनांवरुन पेटला वाद, घटना आपणच वाचविली, असा समज नको असे वक्तव्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी आंदोलन करणारी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) ही संघटना आणि काँग्रेस यांच्यात वाद उफाळून आल्याचे पहावयास मिळत आहे. सीजेपीच्या काही वरीष्ठ नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून देश आणि घटना आपणच वाचविली, असा टेंभा कोणी मिरवू नये, असे वक्तव्य काँग्रेसचे थेट नाव न घेता केले आहे.

काँग्रेस नेते रीतम सिंग यांनी सीजेपीच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सीजेपीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी आसामचा दौरा केला होता. त्यामुळे या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना भेटण्यास नकार दिला होता. ही संघटना आम आदमी पक्षाच्या बाजूने काम करते. ती राजकीयदृष्ट्या त्रयस्थ राहिलेली नाही, अशीही टिप्पणी रीतम सिंग यांनी त्यांच्या टीकात्मक वक्तव्यात केल्याने वाद वाढला आहे.

खोटे 'लिबरल इकोसिस्टम'

रीतम सिंग यांच्या टिप्पणीआधी सीजेपीचे नेते अशुतोष रांका आणि सौरव दास यांनी काँग्रेसचा थेट उल्लेख न करता काही टिप्पणी केल्या. भारतीय जनता पक्षाबाहेरील काही शक्तींनी एक खोटी आणि फसवी उदारवादी इकोसिस्टिम निर्माण केली आहे. या इकोसिस्टिममधील नेत्यांचे स्वत:संबंधी काही गैरसमज आहेत. देशाची लोकशाही आणि भारताची राज्यघटना यांचे संरक्षण आपणच करीत आहोत, अशी या नेत्यांची समजूत आहे. ते स्वत:ला राज्यघटनेचे ठेकेदार समजतात, असे या सीजेपी नेत्यांनी त्यांच्या ‘एक्स‘वरील संदेशात स्पष्ट केले आहे.

काँग्रेसने केले आहे साहाय्य

काँग्रेसने सीजेपीला अनेकदा साहाय्य केले आहे. आसाम पोलिसांनी ज्यावेळी या संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेतले होते, तेव्हा काँग्रेसने त्यांना मोलाचे साहाय्य केले. तथापि, सीजेपीने यासाठी काँग्रेसचे औपचारिक आभारही मानलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या आसाममधील नेत्यांची भेटही सीजेपी नेत्यांनी नाकारली आहे. काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी सीजेपीच्या 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी काँग्रेससह अन्य काही संघटनांनी आसाम राज्य सरकार आणि आसाम पोलिस यांच्यावर टीका केली, असे प्रतिपादन केले गेले.

श्रेयासाठी चढाओढ

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना कोण सर्वाधिक विरोध करणार, या मुद्द्यावरुन आता काँग्रेस आणि सीजेपी यांच्यात वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अनेक आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाची प्रेरणा सीजेपीची आहे, असे या संघटनेने म्हणणे आहे. प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारच्या विरोधात कोणीतरी आवाज उठविला आहे. यामुळे अन्य पक्षांचा जळफळाट होत आहे, अशीही टीका या संघटनेकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनेही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

CJP ची राजकीय महत्वाकांक्षा

सीजेपीची राजकीय महत्वाकांक्षा आता वाढू लागली आहे, असा संशय इतर विरोधी पक्षांना येऊ लागल्याचे दिसून येते. सीजेपीने उघडपणे राजकारणात येऊ नये. या संघटनेने तिचे त्रयस्थ आणि मुद्दाधारित आंदोलने करण्याचे स्वरुप कायम ठेवावे, असे आधी निर्धारित करण्यात आले होते. तथापि, आता ही संघटना आम आदमी पक्षाकडे झ्gढकू लागली आहे. आम आदमी पक्षाची शाखा असल्याप्रमाणे या संघटनेचे वर्तन आहे, अशी टीकाही होऊ लागली आहे. काँग्रेस आणि सीजेपी यांच्यातील वादाचे मूळ हेच आहे. कारण पंजाब राज्यात काही महिन्यांच्या नंतर असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याच दोन पक्षांमध्ये संग्राम होणार आहे. त्यामुळे सीजेपीने आम आदमी पक्षाकडे कल दाखवू नये, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

संदेशांद्वारे मतभेद चव्हाट्यावर

ड काँग्रेसकडून सीजेपीवर दुटप्पीपणाचा आरोप, सीजेपीकडूनही प्रत्युत्तर

ड भाजप बाहेरचे काही पक्ष स्वत:ला घटनेचे ठेकेदार समजल्याचा आरोप

ड आसाममध्ये सीजेपीला काँग्रेसकडून साहाय्य, पण आभारही नाही मानले

ड सीजेपी आम आदमी पक्षाकडे झुकू लागल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप

Comments are closed.