कॉंग्रेस नगरसेवक प्रेम जिहाद प्रकरणात आत्मसमर्पण करतात
इंदोर :
लव्ह जिहादप्रकरणी फरार काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरीला इंदोर न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावे लागले आहे. अन्वर विरोधात 40 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. बाणगंगा पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात दोन गुन्हे नोंद आहेत. अन्वर कादरीच्या कन्येला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. हिंदू युवतींवर बलात्कार करविण्याचा गंभीर आरोप अन्वर विरोधात आहे. अन्वरकडून आर्थिक रसद मिळाल्याची माहिती बलात्कार आणि लव्ह जिहादचा आरोपी अल्ताफ खान आणि साहिलने दिली होती. हिंदू युवतींशी विवाह करा आणि त्यांना अवैध धंद्यात सामील करा, असे अन्वरने या दोन्ही आरोपींना 3 लाख रुपये देत सांगितले होते.
Comments are closed.