आसाममध्ये कॉंग्रेस अशांतता निर्माण करीत आहे!
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममधील अशांततेला काँग्रेस पक्षाची लांगुलचालनाची आणि बोटचेपी धोरणे कारणीभूत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. आसाममधील डेरगाव येथे ‘लचित बरफुकन पोलीस प्रशिक्षण संस्थे’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या समारंभात ते भाषण करीत होते.
काँग्रेसच्या धोरणामुळे आसामचा विचका झाला आहे. आसामच्या विशिष्ट आणि समावेशक संस्कृतीचे संवर्धक करण्याचे धोरण त्या पक्षाने अवलंबिले नाही. इंदिरा गांधींच्या काळात, आसामच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी प्रयक्त केले. पण केंद्र सरकारने ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनात मी लाठ्याही खाल्ल्या आहेत आणि कारावासही भोगला आहे, ही बाब स्पष्ट करताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या काळात या राज्यात सुरक्षितता आणि शांतता निर्माण झाली, असे प्रतिपादन केले.
Comments are closed.