हतबल मुख्यमंत्री काय कामाचा, हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका

पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरू आहे. कोयता गँगचा हैदोस सुरू आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत, पण कारवाई मात्र करत नाहीत. असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर आज सडकून टीका केली.
एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठीशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय? कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत? तीन तरुण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पाहत आहेत? राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी, असे हर्षवर्धन सकपाळ म्हणाले.
पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढा
पुण्यातील कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर अॅट्रॉसिटी कलमाखाली तत्काळ गुन्हे दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.
Comments are closed.