19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप! मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, चव्हाणांचं भाकित
पृथ्वीराज चव्हाण : येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण) यांनी केले आहे. पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते, असंही चव्हाण यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचाही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं. बदल घडला तर काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही. कारण आमच्याकडे काही बहुमत नसल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
आठवड्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण दावा केला होता
दुसरीकडे, आठवड्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य करताना चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला होता. देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. गेल्या सहा महिन्यांपासून एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत सुरू असलेल्या गोंधळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या कागदपत्रांचे तपशील पूर्णपणे उघड झाल्यास त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावरही उमटू शकतात. जेफ्री एपस्टाईन या अमेरिकन उद्योगपतीने अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि विविध देशांतील काही प्रभावशाली नेत्यांची नावे त्यात समोर आली. त्या यादीत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख असल्याचे दिसते. अमेरिकन संसदेने या प्रकरणाचा सातत्याने मागोवा घेत असून सुमारे दहा हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. ती माहिती सार्वजनिक झाली तर ट्रम्प यांना पदाचा राजीनामा देण्याच्या स्थितीत जावे लागू शकते.
आणखी वाचा
Comments are closed.