तेलंगणातील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे
‘बीआरएस’ला झटका : करीमनगर, निजामाबादमध्ये भाजपच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली
वृत्तसंस्था/हैदराबाद
तेलंगणात सत्तेत परतल्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसने शुक्रवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून तेलंगणाच्या शहरी भूभागावर आपली पकड मजबूत केली. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 116 पैकी किमान 83 नगरपालिका आणि सातपैकी पाच महानगरपालिका जिंकत मोठा करिष्मा केला आहे. तसेच 2020 मध्ये बीआरएसने 1,686 वॉर्ड जिंकल्या होते. मात्र, आता फक्त 781 जागांवर समाधान मानावे लागल्याने त्यांनाही मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, भाजपने करीमनगर आणि निजामाबाद महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. आता 16 फेब्रुवारी रोजी नगरपालिका अध्यक्ष आणि महापौरांच्या निवडणुका होणार आहेत.
123 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 2,996 वॉर्डपैकी काँग्रेसने 1,537 जागा जिंकल्या. ही संख्या 2020 च्या नगरपालिका निवडणुकीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 569 जागा मिळाल्या होत्या. डिसेंबर 2025 च्या ग्रामीण निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी करत बहुसंख्य पंचायती जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री ए. रेवंत रे•ाr यांनी या निकालांचे वर्णन गेल्या दोन वर्षांतील काँग्रेस सरकारच्या कल्याणकारी आणि विकासाच्या अजेंड्याचे समर्थन म्हणून केले. मतदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानताना त्यांनी या जनादेशामुळे सरकारची जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट केले.
तेलंगणा नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्यातील राजकीय चित्र बदलून टाकले आहे. काँग्रेसने ‘हात’च्या जादूचा वापर करून दणदणीत विजय मिळवला आहे. बीआरएस आणि भाजपनेही अनेक आघाड्यांवर जोरदार लढत देऊन आपले अस्तित्व दाखवले आहे. 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या या निवडणुकांच्या निकालांवरून राज्यातील जनता सध्या बदल आणि विकासाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
ओवैसींचा प्रभाव
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने एआयएमआयएमनेही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले. पक्षाला चार महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांमध्ये लक्षणीय जागा मिळाल्या. मतमोजणीला वेळ लागला तरी निकाल तेलंगणाच्या राजकारणाच्या भविष्याचे स्पष्ट चित्र दाखवतात. आता हे नवनिर्वाचित प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षा कशा पूर्ण करतात हे पाहायचे आहे.
Comments are closed.