पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे तीन ठिकाणी मतदान, भाजपचा आरोप, CM फडणवीस म्हणाले…

सांगली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (राहुल गांधी) यांनी मतचोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हे आरोप करताना मतदार यादीतील घोळ समोर आणला, त्यानुसार जिवंत व्यक्तींना मृत दर्शवण्यात आले असून बोगस नावेही यादीत आहेत, काहींची नावे दोन-तीन मतदारसंघातही पाहायला मिळाली. आता, राहुल गांधींच्या आरोपानंतर भाजपनेही काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चवन (पृथ्वीराज चवन) यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपच्यावतीने करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अनेक ठिकाणी मतदान आहे. पुतणे इंद्रजीत चव्हाण व इंद्रजीत यांच्या पत्नी, आई, मुलगा यांचे मतदार यादीत तीनवेळा नाव असल्याचे कराडमधील भाजप आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल यांच्यासह त्यांच्या परिवाराचेही तीन ठिकाणी मतदान आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी वय बदलून नाव नोंदणी केल्याचा आरोप कराडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या बोगस मतदान संशोधन समितीचे अध्यक्ष आहेत. पण, त्यांच्याच मतदारसंघात अशाप्रकारे घोळ करणे नैतिक नाही, यापूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांनी असा प्रकार करुनच यश मिळवले असल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आलाय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या परिवाराने अनेक वर्षापासून दुबार-तिबार मतदान करून यश मिळवलं. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांची संमती होती का? असा सवालही भाजपा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार नावे (Prithviraj chavan)

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात दुबार, तिबार मतदान नोंदणी झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून 2014, 2019 ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी विद्यमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘व्होटचोरी’ कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केल्याचेही अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कराडमधील पाटण कॉलनीतील घरात 15 नावं आहेत, त्यातील अनेकजण घरात राहत नाहीत. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील 9 लोकांची दुबार नावे आहेत. दुबार, तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ, पुतणे, वहिनी याच्यासह कुटुंबियांची नावे आहेत. कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नावे असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

अतुल भोसलेंनी जे आरोप केले आहेत, त्यातून खरे वोट चोर कोण हे समोर आलं. याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा

माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवर हाकेंचं स्पष्टीकरण; छगन भुजबळांनीही दिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.