देवेंद्र फडणवीस हे जल्लाद! त्यांनी लोकशाहीला फासावर लटवकण्याचं काम केलं, सपकाळांची जहरी टीका
देवेंद्र फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी जल्लाद म्हणून उल्लेख केला आहे. जल्लाद हा फासावर लटकवण्याचं काम करतो. तसंच देवेंद्र फडणवीस हे देखील लोकशाहीला फासावर लटवकण्याच काम करत असल्याची टीका सकपाळ यांनी केली आहे.
श्रीरामपूर येथील भाषणात बोलताना हर्षवर्धन सकपाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. सचिन गुजर यांचं अपहरण केल्यानंतर सकपाळ यांनी आज श्रीरामपुर येथे जाऊन गुजर यांची विचारपुस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.
सचिन गुजर यांना मारहाण
अहिल्यानगरचे कँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण (Ahilyanagar Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातलं. हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सकाळी सात वाजता अपहरणाची घटना घडली आहे. सचिन गुजर यांचे अपहरण करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. अपहरणाची घटना सीसीटीव्ही कँमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आमदार हेमंत ओगले ,सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.