Congress state president Harshwardhan Sapkal meet Uddhav Thackeray
मुंबई : महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशामध्ये आता प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे काय होणार? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येण्याचीही चर्चा आहे. अशामध्ये शुक्रवारी (16 मे) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना उबठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावेळी काय चर्चा झाली त्याबाबत माहिती दिली. (Congress state president Harshwardhan Sapkal meet Uddhav Thackeray)
हेही वाचा : Rohit Pawar : सत्तेचा, पदाचा गैरवापर कसा असतो ते…; गोरे प्रकरणावरून रोहित पवारांची टीका
“प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्यासाठी आलो आहे. उद्धव ठाकरे आणि त्याआधी शरद पवार यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे? महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल पण आज भाजप धर्म आणि देश बुडवाला निघाला आहे. ही संघर्षाची वेळ आहे. भाजप जे लोकशाही बुडवायला निघाली आहे, त्यासाठीच संर्घष केला पाहिजे. शिवसेना आणि कॉंग्रेस हे कसे सोबत राहतील, याकडेच आमचे लक्ष असणार आहे,” असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांमध्ये काही चर्चा झाली का? असे विचारले असता त्यांनी, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सपकाळ पुढे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भेट घेणे महत्वाचे होते. सर्वांना सोबत घेताना मीसुद्धा त्यांना राहूल गांधी यांच्यावर लिहिलेले पुस्तक दिले. स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढाव्यात? याबाबत दोन्ही पक्षाच्या आपआपल्या भूमिका आहेत. आम्ही आमचा निर्णय सविनय सांगितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीत एकत्र लढायच्या? याचा निर्णय नोटिफिकेशन निघाल्यानंतर घेतला जाणार आहे. स्थानिक पातळीवर चर्चा करून घेतला जाईल,” असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.
Comments are closed.