Congress warns government over Somnath Suryawanshi case
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसेच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागण्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे.
मुंबई : डिसेंबर 2024 मध्ये परभणी येथे एका व्यक्तीकडून संविधानाची विटंबना करण्यात आली होती. ज्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करून कोठडीत मारहाण करण्यात आला, ज्यामध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे आता सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसेच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागण्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे. (Congress warns government over Somnath Suryawanshi case)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी आज बुधवारी (ता. 12 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिद्धार्थ हत्तिअंबिरे म्हणाले की, परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आली. या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनानंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुण वकिलाला अटक करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईमुळेच सूर्यवंशी व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. या घटनेला दोन महिने झाले तरी या दोन्ही कुटुंबांना अजून न्याय मिळालेला नाही. सरकार चौकशीच्या नावाखाली पोलिसांना वाचवत आहे. सरकारने या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, कोंबिंग ऑपरेशन दरम्यान ज्या आंबेडकरी लोकांवर गुन्हे दाखल केले ते तात्काळ रद्द करावे, अशी मागणी हत्तीअंबिरे यांनी केली.
हेही वाचा… Supreme Court : मोफत योजनांच्या खैरातीमुळे लोक काम करेनात, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
तसेच, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. सूर्यवंशी व वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरीत सामावून घ्यावे. संबंधित पोलीसांवर हत्येच्या गुन्ह्यासह ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा. पोलीस मारहाणीत जखमी झालेल्यांना नुकसानभरपाई द्यावी. राज्य सरकारने तातडीने आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा अन्यथा 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी जनतेच्या वतीने आंदोलन करत मंत्रालयाला घेराव घालू, असा इशारा सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिला आहे.
Comments are closed.