पोटात सतत जडपणा जाणवतो? पोटाच्या कॅन्सरनंतर शरीरात दिसून येते 'ही' भयानक लक्षणे, कोणत्याही क्षणी मृत्यू येईल

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे?
कर्करोग टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
कोणत्या सवयींमुळे पोटाचा कर्करोग होतो?
बदललेली जीवनशैली, आहारातील बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक ताणतणाव, दारूचे सेवन आणि इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे शरीरात गंभीर आजार होतात. मागील वर्षाच्या दरम्यान कर्करोगाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडते. सर्वात धोकादायक कर्करोग म्हणजे पोटाचा कर्करोग. लाल मांस किंवा मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार सेवन केल्याने आतड्यांसंबंधी असंतुलन होऊ शकते. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात साचलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला पोटाच्या कॅन्सरनंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(छायाचित्र सौजन्य – istock)
दिवसातून किती वेळा बिअर प्यायची? बिअरची नशा किती काळ टिकते? सविस्तर माहिती जाणून घ्या
पोटाचा कर्करोग का होतो?
पोटाचा कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. पोटाच्या अस्तरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे पोटाची आतील भिंत बदलते, त्यामुळे अन्न पचन, रक्तपुरवठा आणि इतर अवयवांमध्ये अडथळे निर्माण होतात. जठरासंबंधी कर्करोग हा जगातील सर्वात प्राणघातक कर्करोग आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. पूर्वी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान वयाच्या ६० नंतर होत असे, पण आजकाल कोणत्याही वयोगटातील लोकांना कर्करोग होऊ शकतो.
पोटाच्या कर्करोगाची गंभीर लक्षणे:
पोटाच्या कर्करोगानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप सामान्य लक्षणे दिसतात. शरीरातील या लक्षणांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. परंतु कालांतराने शरीरातील लक्षणे वाढतात आणि तब्येत पूर्णपणे बिघडते. जर तुम्हाला पोटदुखी, जेवणानंतर जडपणा, अपचन, सतत गॅस, पोटात अस्वस्थता किंवा वारंवार मळमळ होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. कॅन्सरची लक्षणे वाढल्यानंतर अचानक वजन कमी होणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्त येणे, स्टूलचा रंग बदलणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे आदी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हिवाळ्यात शरीरातील कमी झालेली ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहारात या गोष्टी करा, कायमस्वरूपी निरोगी रहा
पोटाच्या कर्करोगाची कारणे:
पोटाच्या कर्करोगाला कारणीभूत असणारे जीवनशैलीचे अनेक घटक आहेत. प्रक्रिया केलेले, खारट, स्मोक्ड किंवा संरक्षित अन्न, जास्त मीठ, भाज्यांचे कमी सेवन इत्यादींमुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते. याशिवाय लठ्ठपणा, कमी पाण्याचे सेवन, पोषक तत्वांचा अभाव, चुकीच्या वेळी अन्न सेवन यामुळे आरोग्य बिघडते.
Comments are closed.